fbpx

तुम्ही विकत घेत असलेला आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे कि कृत्रिमरीत्या हे अशा प्रकारे तपासून पहा

Source - Google Images

आंबा नैसर्गिकरित्या पिकवला असेल तर फिकर नॉट पण जर आंबा कृत्रिमरीत्या पिकवला असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतात.

फळांचा राजा आंबा म्हणजे अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाना मनापासून आवडणारे फळ. पिवळाधमक, रसरशीत आणि गोड आंबा खायला मिळणं म्हणजे अगदी ब्रम्हानंदी टाळी लागण्यासारखं आहे. आंब्याचा सिझन जेमतेम दोन महिन्यांचा त्यात आंबा मनसोक्त खायचा म्हणल्यावर आंब्यावर आडवा हात मारावाच लागणार. आंबा हे फळ एक असले तरी त्यापासून बनणारे पदार्थ हे अनेक असतात आणि सोबतच चविष्ट देखील असतात.

आंबा, आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे, आंब्याचा सिझन, भेसळ, आंबा नैसर्गिक आहे कि नाही ओळखा, आंबा विकत घेण्यापूर्वी, आंबा घेताना
Image Source – Reader’s Digest

शिरा, आंबा पोळी, आंबा मोदक, आईस्क्रीम अशा एक ना अनेक पदार्थांचा या दोन महिन्यात आपल्याला फडशा पाडावा लागतो. पण हा आंबा खाताना तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे कि नाही हे बघणं देखील महत्वाचं असतं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आंबा खायचा म्हणल्यावर त्याचा कोणत्याही प्रकारे अपाय आपल्याला होता कामा नये. आंबा नैसर्गिकरित्या पिकवला असेल तर फिकर नॉट पण जर आंबा कृत्रिमरीत्या पिकवला असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतात.

आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ करणे अगदी साहजिक झाले आहे मग त्यातून आपला हा राजा तरी कसा सुटणार बरं? आजकाल फळांना लवकर पिकवण्यासाठी आणि त्यांना रसरशीत बनविण्यासाठी सर्रासपणे कार्बाईडचा वापर केला जातो. आणि हे कार्बाईड आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे आज या लेखातून मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा अगदी सहज ओळखू शकता.

चला तर मग जाणून घेऊ या टिप्स.

● आंबा विकत घेण्यापूर्वी हातात घेऊन नीट निरीक्षण करा. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हातात घेतल्यावर तो अतिशय सॉफ्ट आणि नरम असल्याचे तुम्हाला जाणवेल. आंबा पूर्णपणे सॉफ्ट असणे ही नैसर्गिकरित्या आंबा पिकवल्याची पहिली पायरी.

● नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा आकार नेहमी साधारण फुटबॉलच्या आकाराचा असतो जे तुम्ही आंबा हातात घेऊन नीट निरखून पाहू शकता. बऱ्याच वेळा नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर साधारण ब्राऊन रंगाचे डाग आपल्याला दिसून येतात.

● आंबा घेताना कायम त्याच्या देठाकडील भागाचा वास घेऊन बघा. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा देठाकडून नेहमी गोड सुवास येतो.

आंबा, आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे, आंब्याचा सिझन, भेसळ, आंबा नैसर्गिक आहे कि नाही ओळखा, आंबा विकत घेण्यापूर्वी, आंबा घेताना
Image Source – ParTASTE

● आंबा मुळातच गोड असल्याने कार्बाईड लावलेला आंबा हाताला अतिशय मऊ लागतो तसेच तो लवकर आंबल्याने त्याच्यातून दाट दर्प येतो तेव्हा असा आंबा घेण्याचे कायम टाळावे.

● नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग नेहमी पिवळा, हिरवा, गुलाबी किंवा लालसर असतो.आंबा कोणत्या जातीचा आहे यावर त्याचा रंग अवलंबून असतो. पण जर आंबा पिवळाधमक असेल तर निश्चितपणे तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे.

तेव्हा या सिझनला आंबा खरेदी करताना या सर्व बाबी लक्षात घ्या आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा मस्त एन्जॉय करा.


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.