fbpx

बोटं मोडण्याची सवय असणाऱ्यांनी हे जाणून घ्या, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल

Image source-google

इन्फोबझ्झ वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा – Facebook.com/Infobuzzz


लोकांना कंटाळा आला किंवा करण्यासारखे काही काम नसेल तर टाइमपास म्हणून ते बोटे मोडतात. पण असे करणे आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करत असते. बोटांमध्ये किंवा हाडांच्या जोडा मध्ये एक खास प्रकारचा द्रव पदार्थ असतो ज्याला श्र्लेष द्रव असे म्हणतात. हे द्रव आपल्या हाडांना खरबडीत होण्या पासून आणि घर्षणा पासून वाचवते. पण याचा सगळ्याशी काय संबंध ?? घ्या जाणून

दिवसभर आपण अनेक गोष्टी करत असतो आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. आपल्यापैकी अनेकांना बोटं मोडण्याची सवय असते. काही लोकांना कंटाळा आला किंवा करण्यासारखे काही काम नसेल तर टाइमपास म्हणून ते बोटे मोडतात. तर काही लोक बोटांच्या हाडाच्या जॉईंट मध्ये होणाऱ्या वेदना पासून आराम मिळतो असे मानतात. काही लोक असे ठराविक वेळानंतर सारखे असे करतात. तुम्ही असे करण्यामागे कोणताही उद्देश असो पण, काय हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे का, असे केल्यामुळे नुकसान होते?

Image Source – Google

बोटे मोडणे सामान्य आहे काय ?

तुम्ही दिवसभर आपल्या बोटं मोडण्याच्या सवयीकडे लक्ष सुध्दा देत नसतात, तुमच्यासाठी ही एक सवय झाली असते, ज्यामुळे तुमचे या सवयीकडे लक्षही जात नसते. पण ही सवय तुमच्या हाडांसाठी सामान्य आहे का ? आपण बोटे मोडतो तेव्हा त्याचा आवाज का येतो आणि असे करणे आपल्या आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो.

ताज्या बातम्या, जॉब संधी, मनोरंजन, लाईफस्टाईल टिप्स आणि बरंच काही अगदी मोफत तुमच्या व्हाट्सअँपवर, जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा मिस्ड कॉल करा.

बोटे मोडल्यावर आवाज का येतो?

विज्ञानाच्या अनुसार बोटांमध्ये किंवा हाडांच्या जोडा मध्ये एक खास प्रकारचा द्रव पदार्थ असतो ज्याला श्र्लेष द्रव असे म्हणतात. हे द्रव आपल्या हाडांना खरबडीत होण्या पासून आणि घर्षणा पासून वाचवते. तुम्ही असे म्हणू शकता की हे द्रव हाडांच्या जोडामध्ये ग्रीसचे काम करते. या लिक्विड मध्ये असलेला गैस हाडांच्या मध्ये बुडबुडे बनवतो.

बोटं मोडण्याची सवय
Why Do Knuckles Crack? source-google

जेव्हा आपण बोटे ओडतो तेव्हा हे बुडबुडे फुटतात ज्यामुळे बोटे मोडण्याचा आवाज येतो. एकदा बोटे मोडल्यावर हाडांच्या जोडामध्ये असलेले हे बुडबुडे फुटल्यानंतर पुन्हा तयार होण्यास 15 ते 30 मिनिट लागतात. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की एकदा बोटे मोडल्यावर पुन्हा लगेच बोटे मोडली तर आवाज येत नाही.

आपल्या हाडांसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे

तज्ञांच्या मते हे लिक्विड आपल्या हाडांच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर हे कमी झाले किंवा संपले तर हाडे एकमेकांना घासल्यामुळे जोडांमध्ये वेदनासुरु होतात.

बोटं मोडण्याची सवय
This figure shows a synovial joint. The cavity between two bones contains the synovial fluid

बोटं मोडण्याची सवय तुमच्यासाठी करू शकते अनेक समस्या उत्पन्न

तसे पाहिलेतर अनेक शोधांच्या अनुसार बोटे मोडल्यामुळे या लिक्विड मध्ये कमतरता येणे, सांध्यामध्ये वेदना यासर्वाशी काही संबंध नाही पण तज्ञ असे मानतात की बोटं मोडण्याची सवय तुमच्या हाडांसाठी चांगले नसते. त्याच सोबत जर तुम्ही सारखे सारखे सांध्यांना असे ओढले किंवा त्यावर ताण दिला तर हाडामध्ये गैप येऊ शकतो. बोट मोडण्याची ही एक वाईट सवय आहे. बोटे मोडल्यामुळे सांध्यांना हानी पोहचते, त्यामुळे ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा.

ताज्या बातम्या, जॉब संधी, मनोरंजन, लाईफस्टाईल टिप्स आणि बरंच काही अगदी मोफत तुमच्या व्हाट्सअँपवर, जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा मिस्ड कॉल करा.

आपल्याला लिहायची आवड आहे किंवा आपण लेखक आहेत ? कवी आहेत ? तुमचा बहुमूल्य लेख आम्ही “इन्फोबझ्झ” वर तुमच्या नावासहित प्रदर्शित करू. तुमचे लेख आम्हाला Infobuzzweb@Gmail.com या ईमेलवर पाठवा.


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.