fbpx

दुधाचे विविध प्रकार आणि फायदे – तोटे तुम्हाला माहित आहेत का ?

Image source- google

दूध म्हणजे सकस आणि पूर्णान्न. चार चपात्या खाल्ल्यावर पण जेवढी ताकद येत नाही तेवढी ताकद फक्त एक ग्लास दूध पिल्याने येऊ शकते.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुधाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि म्हणूनच प्रसंग कोणताही असो दुधाला आपल्याकडे कायमंच वरचढ स्थान असते. आजपर्यंत आपल्याला गायीचे दूध आणि म्हशीचे दूध एवढेच दोन दुधाचे प्रकार माहीत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला दुधाच्या तुम्ही कधीही न ऐकलेल्या प्रकारांबाबत सांगणार आहोत. आणि त्याचबरोबर दुधाचे विविध फायदे आणि तोटेदेखील सांगणार आहोत. एकंदर काय तर आजचे आर्टिकल अगदी अमृतमय असे आहे.

चला तर मग अधिक जाणून घेऊ या पूर्णान्नाबाबत.

दुधाचे प्रकार –

● गायीचे दूध – हिंदू धर्मामध्ये गायीला कायमंच मातेचा दर्जा दिला जातो.त्यामुळे गायीचे दूध हे आपल्याला आईच्या दुधाइतकेच उपयुक्त आहे.गायीचे दूध पिल्याने आपले शरीर कायम सुदृढ राहते.गायीचे दूध रोज पिल्याने कॅन्सर, HIV, ह्दयरोग, रक्तदाब, मायग्रेन सारखे आजार होत नाहीत.

● सोया मिल्क – सोया मिल्कमध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.हे दुध कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक आशा खनिजांनी परिपूर्ण असे असते.

● राईस मिल्क – राईस मिल्कमध्ये व्हिटॅमिन इ आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.जर तुम्ही रोज एका विशिष्ट प्रमाणात राईस मिल्कचे सेवन केले तर ह्दयरोग, कॅन्सर अशा मोठ्या आजारांपासून तुमचे संरक्षण नक्कीच होऊ शकते.

दुधाचे प्रकार, दुधाचे फायदे आणि तोटे, गायीचे दूध, दूध पिण्याचे फायदे, दूधाचे तोटे, dudhache fayde, दूध कधी प्यावे, Milk Benefits and Side Effects, in marathi
Image Source – Curetick

● बदाम दूध – बदाम दुधात भरपूर कॅलरीज, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशिअम, कॉपर असल्याने त्याचे रोज सेवन केल्यास वजन कमी करण्यास, हाड मजबूत बनवण्यात, त्वचेला तजेला आणण्यास ते फायदेशीर ठरते.

● ऑरगॅनिक दूध – ऑरगॅनिक दूध म्हणजे कोणत्याही प्रकारचे भेसळ नसलेले शुद्ध गायीचे दूध.बऱ्याच वेळा गायींना दूध जास्त यावं म्हणून त्यांना काही इंजेक्शन्स दिली जातात पण ऑरगॅनिक दुधात मात्र गायीला कोणत्याही प्रकारे औषधे न देता चांगल्या प्रतीचे दूध मिळते जे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

● म्हशीचं दूध – म्हशीच्या दुधाची खासियत म्हणजे हे दूध पचायला अतिशय हलके असल्याने कोणत्याही वयाचे लोक या दुधाचे सेवन करू शकतात.म्हशीच्या दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शिअम असल्याने आपल्या हाडांसाठी हे दूध अतिशय उपयुक्त असते.

● नारळाचे दूध – नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ३, आणि व्हिटॅमिन बी ५ असल्याने हे दूध अतिशय स्वास्थकारक असते.ज्यांना प्राण्यांच्या दुधाची ऍलर्जी असेल त्यांच्यासाठी हे दूध एक उत्तम पर्याय आहे.

 लहानपणासूनच आपण सर्व आपल्या आई आजी यांच्याकडून दूध पिण्याची महती ऐकत आलो आहोत.पण आपल्यापैकी बरेच ज  आज पण दूध प्यायचं म्हणल्यावर नाक मुरडतात.पण जर तुम्ही हे दूध पिण्याचे फायदे वाचले तर नक्कीच आजपासून तुम्ही आवडीने दूध प्यायला लागाल यात दुमत नाही.

चला तर मग जाणून घेऊ दूध पिण्याचे फायदे.

● दुधामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे आपल्या हाडांना बळकटी येते.

● दुधात कॅल्शियम आणि आयोडीन असल्यामुळे आपले दात मजबूत होण्यास मदत होते.

● दुधात अमिनो ऍसिड ट्रायटोफन असल्यामुळे रोज रात्री झोपण्या आधी एक ग्लास दूध पिल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

● रोज दूध पिल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन आपली त्वचा अधिक तजेलदार दिसू लागते.

Image Source – exhibitarchives.com

● दुधातील कॅल्शियममुळे डिहायड्रेशनपासून आपला बचाव होतो.आता खायचा कोणताही पदार्थ असला कि त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात.मग दूध तरी यापासून कसे वंचित राहील.चला तर मग जाणून घेऊ दूधाचे तोटे.

● दुधात लॅक्टोज असल्याने दुधाचे अतिसेवन आपली पचनक्रियेत अडथळा आणू शकते.

● दुधाच्या अतिसेवनाने गॅस, पोटफुगी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवु शकतात.

● बऱ्याच लहान मुलांना दुधातील कैसीईन प्रोटीन पचत नाही त्यामुळे मुलांना विविध आजरांचा सामना करावा लागतो.

शेवटी मी एकच सांगेल कि, दूध काय किंवा इतर कोणताही पदार्थाचा अतिरेक कधीही करू नका तरच तू तुम्हाला फायदेशीर ठरेल.

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.