fbpx

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी महाराष्ट्रातील नयनरम्य ठिकाणे

Image source-google

पावसाळा म्हणजे सगळ्यांचाच आवडत ऋतू. उन्हाळ्यात ऊन बेचैन करते आणि हिवाळ्यात थंडी बोचते पण पावसाळा असा एकच ऋतू असतो ज्याचा कोणालाही काहीही त्रास होत नाही उलट तो हवाहवासा वाटतो. पावसाळा म्हणलं कि सगळ्यांचंच मन पावसाळी पिकनिक करण्यासाठी हट्ट धरत असतं.

पण बऱ्याच वेळा कामानिमित्त जास्त दिवस सुट्टी काढून कुठे मनसोक्त फिरण्याचा जास्त आनंद घेता येत नाही.आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहे जिथे जाऊन तुमची पावसाळी पिकनिक एकदम ओली चिंब होऊन जाईल.

चला तर मग जाणून घेऊ पावसाळी पिकनिक स्पॉटबद्दल.

१. माळशेज घाट

मुंबईकडे जाताना वाटेत लागणारा माळशेज घाट पावसाळ्यात अतिशय नयनरम्य असा असतो.तुम्ही मुंबई, पुणे, नगर कुठेही राहत असला तरी हा रेनी पिकनिक स्पॉट तुम्हाला अगदी मध्यवर्ती ठिकाणावर आहे.घाटाच्या दोन्ही बाजूने अवाढव्य दरडी, त्यातून झुळुझुळू वाहणारे धबधबे, अंगाला झोम्बणारा वारा आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा हे माळशेज घाटाचं वैशिष्ठय. माळशेजला जाऊन तुम्ही एकाच दिवसात तुमची पावसाळी पिकनिक मस्त एन्जॉय करू शकता.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Malshej Ghat is a must visit place in rainy season

माळशेज घाटात आपल्या पोटपूजेची पण उत्तम अशी सोय आहे.येथील प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारी मिसळ म्हणजे अफलातूनच. तर मग या पावसाळ्यात नक्की माळशेज घाटला भेट द्या आणि एन्जॉय करा.

२. ठोसेघर धबधबा

जोमाने कोसळणारा पाऊस आणि त्यातंच खळाळून वाहणारे धबधबे असा विचार जरी केला तरी मन अगदी प्रफुल्लित होतं. पण हा आनंद जर तुम्हाला फक्त मनात न ठेवता प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर ठोसेघर धबधबा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.साताऱ्यापासून वीस किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावात हा धबधबा आहे. या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतल्यावर तुम्ही येथील स्थानिक हॉटेलमध्ये चुलीवर बनवलेल्या अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद देखील घेऊ शकता.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
A spectacular view of Thoseghar Waterfall

३. भंडारदरा

अहमदनगरमधील अकोला तालुक्यात असलेले भंडारदरा हे ठिकाण पावसाळी पिकनिकसाठी एक हटके स्पॉट आहे. भंडारदरा येथील विल्सन डॅम आणि आर्थूर लेक ही ठिकाणे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. दरवर्षी पावसाळ्यात येथे काजवा महोत्सव भरतो तो अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो. त्यामुळे तुमच्या दोन दिवसांच्या छोट्याशा पावसाळी पिकनिकसाठी भंडारदरा हे ठिकाण अगदी सार्थ आहे.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Camping Site in Bhandardara

४. रतनवाडी

अहमदनगरमधील रतनवाडी हे भंडारदरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे ठिकाण पावसाळी पिकनिकसाठी अतिशय योग्य असे आहे. भंडारदराला गेल्यावर रतनवाडीला आवश्य जावे असे हे ठिकाण आहे. रतनवाडीला गेल्यावर रतनगड किल्ला आणि अमृतेश्वर मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. तुम्ही जर ट्रेकिंगचे शौकीन असाल तर रतनवाडी हे गाव तुमची वाट नक्कीच पहात असते.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Amruteshwar temple, Ratanwadi

५. घाटघर

अहमदनगर येथील अकोल्यातील घाटघर म्हणजे ओलेचिंब होण्यासाठीचे सुयोग्य ठिकाण. घाटघर येथे दरवर्षी पावसाळ्यात ५००० मीमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. हिरवीगार झाडे, अवाढव्य डोंगर, मोठा जलविद्युत प्रकल्प ही घाटघरची ओळख. त्यामुळे जर तुम्हाला पावसात भिजण्याची आवड असेल तर या पावसाळ्यात घाटघरला नक्की भेट द्या.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Ghatghar Dam, AhmedNagar

६. कळसुबाई

जर तुम्हाला पावसाळ्यात दाट हिरव्यागार झाडीतून पावसात भिजत ट्रेकिंग करावं वाटत असेल तर कळसुबाई हे ठिकाण तुमच्यासाठीच बनलेले आहे. कळसूबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Kalsubai is a awesome destination for trekking in monsoon

७. विदर्भ – मराठवाडा

ऋतू कोणताही असो विदर्भ आणि मराठवाड्यात त्याची कृपादृष्टी कायमच चांगली असते. एकदा येथे पाऊस पडायला लागला तो लवकर बंद होण्याचे नावच घेत नाही त्यामुळे पावसाळा प्रेमींसाठी विदर्भ मराठवाडा म्हणजे पर्वणीच.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Tha hajra waterfall in Gondia district

८. चिखलदरा 

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे पावसाळ्यात जाण्यासाठी उत्तम दर्जाचे हिल स्टेशन आहे. चिखलदऱ्याला विदर्भाचे नंदनवन म्हणून देखील ओळखले जाते. चिखलदऱ्यातील विविध पॉईंट्स हे पर्यटकांचे कायमच आकर्षण ठरतात.

पावसाळा, पावसाळ्यात फिरायला जा, माळशेज घाट, ठोसेघर धबधबा, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, कळसुबाई, विदर्भ, महाराष्ट्र पर्यटन, पावसाळ्यातील भ्रमंतीची ठिकाणे, पिकनिक, maharashtra tourism, in marathi, malshej ghat, kalsubai, bhandardara, thoseghar waterfall, ghatghar, naneghat
Narnala Fort, Chikhaldara

नक्कीच या पावसाळी पिकनिक स्पॉटचा विचार करा आणि आजच तुमचे रेनी पिकनिक डेस्टिनेशन ठरवा.

Leave A Reply

Your email address will not be published.