fbpx

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा कि नाही, केल्यास असे असतील परिणाम ?

Image Source - Google

बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी बद्दल आणि मासिक पाळी दरम्यान काय करावे आणि काय नाही या बद्दल माहिती नाही. विशेषतः जेव्हा गोष्ट असते मासिक पाळी दरम्यान सेक्स करण्याची.

मासिक पाळी हि महिलांमध्ये घडणारी एक शारीरिक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी बद्दल आणि मासिक पाळी दरम्यान काय करावे आणि काय नाही या बद्दल माहिती नाही. विशेषतः जेव्हा गोष्ट असते मासिक पाळी दरम्यान सेक्स करण्याची. मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा कि नाही हि शंका प्रत्येक महिलेच्या मनात असतेच. पण याबद्दल माहिती नसल्यामुळे आणि काही चुकीच्या पसरलेल्या अफवांमुळे मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे स्त्रिया टाळतात. पण या मागे वास्तविक काही धोका आहे का ते जाणून घेऊयात….

 

मासिक पाळी म्हणजे काय ?

मासिक पाळी केवळ एक महिलांच्या शरीराशी निगडित प्रक्रिया आहे जी एका ठराविक काळानंतर होत असते. मुलगी वयात आल्यावर तिच्या योनीतुन रक्तस्त्राव होऊ लागतो यालाच मासिक पाळी म्हणतात. मासिक पाळीची प्रक्रिया स्त्रियांच्या प्रजनन क्रियेशी निगडित आहे, त्यामुळे हा प्रक्रिया नियमित होणे स्त्रियांच्या तब्येतीसाठी महत्वाचे आहे. मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे चुकीचे आहे हि धारणा मुळात पूर्णपणे चुकीची आहे, कसे ते पाहुयात.

 

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा कि नाही, sex during menstruation period
(Source – Health Marathi)
मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्यास ?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्यास पुरुष किंवा स्त्रीच्या आरोग्यासाठी मुळीच धोक्याचे नाही, याने तुमच्या तब्येतीला कुठलाही धोका पोहोचत नाही. त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता तुम्ही मासिक पाळी दरम्यान सेक्स चा आनंद घेऊ शकता. या काळात सेक्स केल्यास तुमच्यासाठी विशेषतः स्त्रियांसाठी फायद्याचेच राहते. तसेच बऱ्याच लोकांना मासिक पाळी दरम्यान सेक्स करायला जास्त सोपे जाते कारण स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये एक प्रकारचा ओलावा असतो. त्यामुळे सेक्स करणे सोपे होते आणि सेक्सचा पुरेपूर आनंद देखील लुटता येतो.

 

या वेळेत सेक्स केल्यास तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद लुटू शकता

 

काय आहेत फायदे ?

अश्या काळात सेक्स केल्याने स्त्रियांच्या गर्भाशयातून रक्त आणि एक द्रव्य बाहेर पडते आणि या मुले महिलांच्या मासिक पाळीचा अवधी कमी होतो. यासोबतच शरीरात वेदना उत्पन्न करणारे तत्व देखील बाहेर पडतात परिणामी मासिक पाळी दरम्यान वेदना कमी होतात. बऱ्याच वेळा मासिक पाळीच्या काळात महिलांचा स्वभाव चिडचिडा होतो पण सेक्स केल्याने चिडचिडेपणा कमी होऊ शकतो. सोबतच शरीरातील तणाव देखील कमी होतो आणि स्त्रियांना समाधानकारक वाटू लागतं.

 

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा कि नाही, sex during menstruation period
(Source – Freepik)

 

मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात हार्मोन्सचे बदल घडून येतात आणि सेक्स करण्याची उत्तेजना निर्माण होते. अश्या  काळात सेक्स केल्यास महिलांना सेक्सचा परमोच्च आनंद लुटता येतो. मासिक पाळी दरम्यान सेक्स केल्यास गर्भवती होण्याचे शक्यता कमी असतात पण कंडोम वापरणे कधीही उत्तम. सोबतच मासिक पाळीच्या काळात प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे. स्वच्छता नसेल तर तुम्हाला आजारांना सामोरे जावे लागू शकते. जर महिला काही इन्फेक्शननी ग्रासलेल्या असतील तर अश्या काळात सेक्स न केलेलाच आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते.

 

किस करायला आवडतं ? मग त्याचे फायदे काय आहेत तेही माहित असुद्या

जगभरात किसला प्रेम करण्याचा भाव म्हणून ओळखले जाते. ज्याला मराठीत चुंबन, मुका असे म्हटले जाते. तसेच हिंदी मध्ये चुंबनाला पप्पी असे म्हटले जाते आणि इंग्रजित किस असे म्हटले जाते. अलीकडे खोबय्रा-गाजराच्या किसाचे विनोद फार प्रचलीत आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते म्हणून अतिशयोक्ती म्हणून याचा वेगळा विनोदी वापर देखील केला जातो. असो, खुलेआम किस करण्यासाठी भारतात तर संस्कृतीच्या विरूध्द असल्याचे मानले जाते. पण एकांतात दोन प्रेमी युगल एकत्र असताना किसिंग होते म्हणजे डेफेनेटली होतेच.

 

मासिक पाळी दरम्यान सेक्स करावा कि नाही, sex during menstruation period
(Source – AliExpress.com)

 

आपल्या प्रिय व्यक्तिला रोमँटीक करण्यासाठी आपण किस करत असतो. जेणेकरून दोघांतील प्रेम वृध्दींगत करण्याचे एक मार्ग असते. पण केवळ किसचे एवढेच फायदे नाही आहेत किस करण्याचे अनेकानेक फायदे आहेत. आज आम्ही त्यातीलच काही तुमच्यासाठी आरोग्य दायक फायदे सांगणार आहोत. किस करण्याचे आमच्या हाती लागलेले अद्भूत फायदे पुढील प्रमाणे.

 

स्त्रियांना रात्रीच सेक्स करणे का आवडते!

 

त्वचा नितळ राहते

चेहऱ्यावरील त्वचा नितळ राहण्याला किस कारणीभूत ठरते. किस करताना चेहऱ्यावरील काही पेशी ओढल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात आणि त्वचा नितळ राहत.

ताण कमी करणं

तुम्हाला जर तुमच्या कामाचा रोज ताण होत असेल तर तुमच्या प्रिय जोडीदाराचा एक किस त्यावर चांगला फायदेशीर ठरू शकतो. किस केल्यावर शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात. एक किस तुम्हाला दिवसभरातील अनेक दुःख विसरायला मदत करू शकते.

कॅलरीज कमी करणं

वजन कमी करण्यासाठी लोक कॅलरीज जाळतात आणि त्यासाठी त्यांचा बराच खटाटोप चालेल असतो. किसिंग केल्याने एका मिनिटात २-३ कॅलरीज बर्न होतात. म्हणून जर तुम्हाला वजन घटवायचे असेल तर हा उपाय लाभदायक ठरू शकतो.


 

No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.