fbpx

पुरुषांच्या तोडीस तोड देऊन ती बनली ‘पहिली महिला हवाई अभियंता’

२६ फेब्रुवारीला एअर स्ट्राईक झाले. हवाई दलाच्या अचूक रणनीतीमुळे मोहीम अवघ्या २१ मिनिटात संपन्न झाली. पण तुम्हाला हे माहित आहे का कि अश्या हल्लाच्यावेळी वैमानिकाइतकीच महत्वाची भूमिका असते ती उड्डाण अभियंत्याची. इथे तांत्रिक नियोजनालाही तेवढेच महत्व आहे. विमानातील सर्व तांत्रिक बाजूंची खातरजमा करतो तो उड्डाण अभियंता. १९९३ सालापासून महिलांना हवाईदलातील कमिशन अधिकारी हे पद मिळू लागले. तो एक महत्वपूर्ण टप्पा होता व २०१८ साली भारतीय हवाई दलाने अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

तो निर्णय म्हणजे महिलांना उड्डाण अभियंता हे पद देण्याचा. अश्याच यशस्वी महिला उड्डाण अभियंता बनणाऱ्या धाडसी महिलांमध्ये एक नाव अजून घ्यायलाच हवे ते नाव आहे “हिना जयस्वाल”. महिलांना हवाई दलात संधी मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचे खरेच सोने केल्याचे आढळते. त्याचं खरंखुरं उदाहरण द्यायच झालंच तर “हिना जयस्वाल”. हिना जयस्वाल हि नुकतीच पहीली महिला अभियंता म्हणून नावारूपाला आली आहे. हिना फ्लाईट लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहे. हवाई दलामध्ये उड्डाण अभियंताची भुमिका हि खूप महत्त्वाची असते.

Hina Jaiswal, Flight Lieutenant Hina Jaiswal, flight engineer, first female flight engineer, women flight engineer, indian air force, iaf, women of iaf
Hina Jaiswal Becomes IAF’s First Female Flight Engineer (Source – Momspresso)

त्यात वेगवेगळ्या परिस्थितीत टिकाव धरण्याचे कसब असावे लागते. त्यासाठी काटेकोरपणा, कष्टप्रियता व कामाबद्दल असणारी समर्पकता आवश्यक असते. २०१८ मध्ये हवाई दलाने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महिलांना उड्डाण अभियंताचे पद दिले. एरवी ते फक्त पुरूषांसाठीच असायचे, पण हिनाने मोठ्या मेहनतीने वेलहांका इथे प्रशिक्षण घेऊन नाव मिळवले. सियाचिन, हिमनदी, अंदमान, निकोबार सारखी बेटे आणि काही प्रतिकूल हवामानात ती सध्या भारतीय विमानाचे नियंत्रण करणार आहे असे समजते.

Hina Jaiswal, Flight Lieutenant Hina Jaiswal, flight engineer, first female flight engineer, women flight engineer, indian air force, iaf, women of iaf
Indian air force (Source – Hindustan Times)

पंजाब विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हि पदवी पूर्ण करणार्या हिनाने एका न्युज चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले कि “आज खय्रा अर्थाने माझे स्वप्न पुर्ण झाले.” ती पुढे म्हणाली की बालपणापासून ती सैनिकांचा पोशाख घालायचा प्रयत्न करायची. 5 जानेवारीला, हिना आयएएफच्या अभियांत्रिकी शाखेत कार्यरत होती, तिथे तिने अग्निशमन दल आणि एअर मिसाइल स्क्वाड्रनच्या सरफेसमध्ये बॅटरी कमांडरची चीफ म्हणून काम केले. फ्लाइट अभियंत्याच्या सहा महीने सुरू असलेल्या प्रकल्पात तिने तिच्यासोबत असणाय्रा पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून प्रशिक्षण पुर्ण केले.

Hina Jaiswal, Flight Lieutenant Hina Jaiswal, flight engineer, first female flight engineer, women flight engineer, indian air force, iaf, women of iaf
Flight Lt. Hina Jaiswal (Source – Twitter)

तिने आपले स्वप्न पुर्ण करून दाखवले. हिनाचा जन्म तसा चंदीगढचा. संरक्षण खात्यातून निवृत्त झालेले डि.के जयस्वाल व अनिता जयस्वाल यांची ती एकुलती एक मुलगी. भारताच्या हवाई दलात अभियांत्रिकी विभागात ५ जानेवारी २०१५ पासून रूजू झाली. तिने फायरिंग टिमचेही नेतृत्व केले. क्षेपणास्त्रांचा मारा करणाय्रा विमानांचे संचलनही तिने केले. तिला येणाय्रा सर्व संकटाना तिने हसत हसत पार केले. मग त्यानंतर ती आपल्या यशाची शिखरे गाठत पुढे पुढे चालत राहीली.

Hina Jaiswal, Flight Lieutenant Hina Jaiswal, flight engineer, first female flight engineer, women flight engineer, indian air force, iaf, women of iaf

हवाई दलात होणाऱ्या लैंगिक मतभेदाला मात देऊन तिने आपले ध्येय गाठले. १९९३ पासून महिलांना हवाई दलात कमिशन अधिकारी हे पद मिळण्यास पहिल्यांदा सुरवात झाली. हवाई दलातील महिला अधिकारी किरण शेखावत हि २०१५ मध्ये गोव्यानजीक डोर्नियर अपघातात मरण पावली. आपलं कर्तव्य बजावताना तिचा अचानक मृत्यु घडणे हा खरच मनाला चटका लावणारा क्षण होता. याचा अर्थ देशासाठी जीव ओवाळायला महिलासुद्धा आता मागे राहील्या नाहीत. त्याही निर्भयपणे आज जगासमोर उभ्या आहेत.

Hina Jaiswal, Flight Lieutenant Hina Jaiswal, flight engineer, first female flight engineer, women flight engineer, indian air force, iaf, women of iaf
(Source – deccanchronicle.com)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.