fbpx

विश्वास बसणार नाही ! या IAS टॉपरने हार्वर्ड विद्यापीठात जाऊन १०१ % मार्क मिळवले

Image Source - Google

काही वर्षांपूर्वी एक जाहिरात लागायची, अप्सरा पेन्सिलची. मुलगा त्याच्या वडीलांना म्हणतो गणितात १०० पैकी १०५ मिळालेत, “एक्सट्रा मार्क्स फॉर गुड हँडरायटिंग” ऐकून गम्मत वाटायची कि ठरलेल्या गुणांच्यावर अजून गुण कसे मिळू शकतात ? पण हे अशक्य नाही. हे शक्य करून दाखवले आहे भारतीय तरुणाने आणि ते ही हार्वर्ड विद्यापीठात. माणसाची ‘इच्छा’ सर्वकाही बदलू शकत नाही, पण जर त्याने ‘निश्चय’ केला तर तो नक्कीच सगळं मनाप्रमाणे घडवून आणू शकतो.

अशीच कथा आहे अंकुर गर्ग या पटियाला शहरातील पंजाबच्या तरुणाची. तो B-tech पदवी IIT दिल्लीहुन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. पण त्याचं स्वप्न सुरुवातीपासूनच सिव्हिल-सर्व्हिसेसमध्ये देशासाठी काम करायचं हे होतं. म्हणून २२ वर्षांच्या अगदी छोट्या वयात आय.ए.एस (IAS) परीक्षा तो पहिल्याच प्रयत्नात अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला आणि आता हार्वर्ड विद्यापीठात त्याने एक नवीन विक्रम नोंदविला आहे. त्याने १७० गुणांच्या परीक्षेत १७१ गुण मिळविले आहेत.

ankur garg ias education, ankur garg ias harvard, ankur garg ias batch, ias topper ankur garg, who is ankur garg, ankur garg 171/170, अंकुर गर्ग, आयएएस अंकुर गर्ग, अंकुर गर्ग हार्वर्ड, ankur garg in marathi, ankur garg information
A 2002 batch IAS officer, Ankur Garg (Source – Times Now)

होय ! हे अगदी खरे आहे, आणि त्याच्या या प्रगतीपुस्तकावर सही केली आहे ती खुद्द जेफरी फ्रैंकेल (जगदविख्यात मायक्रो इकोनॉमिस्ट) यांनी. अंकुरला हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘मास्टर डिग्री इन मायक्रो इकॉनॉमिक्स’ या विषयाच्या शेवटच्या परीक्षेत हे गुण मिळाले आहेत. फ्रैंकेल यांनी गुणांच्या खाली, “आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स ओव्हर ऑल” असे कौतुक करणारे वाक्य सुद्धा लिहिले आहे. एकूण ४ विषयांपैकी २ विषयात २-२ गुण जास्ती मिळाले आहेत, तर एका विषयात २ गुण कमी तर एकामध्ये एक गुण कमी मिळाला आहे.

ankur garg ias education, ankur garg ias harvard, ankur garg ias batch, ias topper ankur garg, who is ankur garg, ankur garg 171/170, अंकुर गर्ग, आयएएस अंकुर गर्ग, अंकुर गर्ग हार्वर्ड, ankur garg in marathi, ankur garg information
Ankur Garg (Source – GNS News)

असे एकूण १७० पैकी १७१ म्हणजेच १०१% गुण गर्ग यांना प्राप्त झाले आहेत. अंकुर यांनी आपल्या पूर्ण यशाचे श्रेय आपल्या वडिलांना देऊ केले आहे. याबद्दल त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली, ज्यात ते म्हणतात. शाळेत असतांना नेहमी वडील म्हणायचे, “१० पैकी १० गुण कुणीही घेईल पण १० पैकी ११ गुण पडले पाहिजे” तेंव्हा मला नवल वाटायचे पण आज मी ते खरे करून दाखवले. या पोस्टमध्ये त्यांनी आपला फोटो तसेच मार्कशीट सुद्धा टाकले आहे.

ankur garg ias education, ankur garg ias harvard, ankur garg ias batch, ias topper ankur garg, who is ankur garg, ankur garg 171/170, अंकुर गर्ग, आयएएस अंकुर गर्ग, अंकुर गर्ग हार्वर्ड, ankur garg in marathi, ankur garg information
Ankur Garg (Source – The Better India)

अंकुर गर्गचे वडील डॉ. के.सी. गर्ग हे प्लास्टिक सर्जन असून सध्या दिल्ली शहरात ते आपल्या कुटुंबा समेवत राहतात. अंकुरच्या उदाहरणामुळे आपल्या नक्कीच लक्षात येईल कि जगात अशक्य असे काहीच नाही. इंग्रजी मध्ये म्हणतात ना “Impossible word itself says that I AM Possible”. फक्त आपली जिद्द आणि योग्य दिशेने प्रयत्न आपल्याला ते साध्य करायला मदत करतात आणि ते अवघड ध्येय सहज सोपे होऊन यश आपल्याला गवसणी घालते.

ankur garg ias education, ankur garg ias harvard, ankur garg ias batch, ias topper ankur garg, who is ankur garg, ankur garg 171/170, अंकुर गर्ग, आयएएस अंकुर गर्ग, अंकुर गर्ग हार्वर्ड, ankur garg in marathi, ankur garg information
Ankur Garg (Source – Times Prime)

अंकुरने इतक्या परिपुर्ण तयारीनिशी पेपर लिहिला की, परीक्षकाचीच परीक्षा घेतली. मार्क कापायचे तर कुठे आणि कसे ? अश्या या १०१ % हुशार भारतीय तरुणाचा आपल्या सगळ्यांना नक्कीच अभिमान आहे. नवीन पिढीने त्याच्या कडून प्रेरणा घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. शेवटी तुमचे यश तुमच्याच हातात असते आणि त्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, अथक परिश्रम हे घ्यावेच लागतात. म्हणूनच जुने लोक म्हणतात तुम्ही मनापासून प्रयत्न केले अवघडात अवघड गोष्ट तुम्ही साध्य करू शकता.

ankur garg ias education, ankur garg ias harvard, ankur garg ias batch, ias topper ankur garg, who is ankur garg, ankur garg 171/170, अंकुर गर्ग, आयएएस अंकुर गर्ग, अंकुर गर्ग हार्वर्ड, ankur garg in marathi, ankur garg information
IIT Graduate and Youngest IAS Topper scores 171/170 in Harvard University (Source – Jagran Josh)
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.