fbpx

तुमच्या या ‘कर्तव्या’मुळे ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडू पदकांचा पाऊस पाडतील.

प्रेक्षकांच्या पाठींब्या शिवाय खेळाडू अपूर्ण असतो आणि अपूर्ण खेळाडू यश मिळवू शकत नाही हे वास्तव आहे.

टीव्ही वर देशातला कुठलाही रियालिटी शो असो वा कुठलीही मालिका असो…सगळं गणित अवलंबून असतं ते त्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रसिद्धीवर म्हणजेच प्रेक्षकांच्या सपोर्ट वर. असे कार्यक्रम पाहण्यासाठी जर प्रेक्षकच नसतील तर ? चालवेल का कोणी हे कार्यक्रम ? अगदी तसंच आहे भारताच्या उज्वल भविष्य असणाऱ्या खेळाडूंबद्दल…

सचिन तेंडूलकर…विराट कोहली…सायना नेहवाल…पी व्ही सिंधू….जगभरात ह्यांची ख्याती आहे…पण याच खेळाडूंच्या आयुष्यातून प्रेक्षक नावाचा दुवा जर काढून टाकला अथवा वजा केला तर काय उरेल हो ? हि नावं जगप्रसिध्द झाली असती का ? म्हणजे याचाच अर्थ असा कि प्रेक्षक या शब्दाशिवाय जगातील कोणतीच कला कोणताच खेळ अथवा कोणतीच कलाकृती पूर्ण होऊच शकत नाही…! पण भारतीय खेळ विश्वात हाच प्रेक्षक कुठेतरी लुप्त होत चाललाय का ? क्रिकेट सारख्या खेळा पुरताच तो मर्यादित राहिलाय का ? भारतीय क्रीडा प्रेक्षकांनी याचा विचार नक्की करायला हवा…कारण प्रेक्षकांच्या पाठींब्या शिवाय खेळाडू अपूर्ण असतो आणि अपूर्ण खेळाडू यश मिळवू शकत नाही हे वास्तव आहे.

कर्तव्य, ऑलम्पिक, भारतीय खेळाडू, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, क्रिकेट, khelo india, खेलो इंडिया, khelo india 2018, indian olympic winners, in marathi
Image Source – Mashable

क्रिकेट हा खेळ सोडला तर असा खेळ शोधणे अवघड आहे कि ज्याला प्रेक्षकांचं व्यापक समर्थन मिळते…खरं तर भारतीय क्रीडा क्षेत्राची परंपरा प्राचीन आहे…अनेक मल्ल आणि नेमबाज या भारताच्या मातीने घडविले आहेत परंतु ते फार जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी त्यांच्या करिता प्रेक्षकांनी दाखविलेली उदासीनता. आणि पुढे ह्याच उदासीनते मुळे त्या मल्लांची किंवा नेमबाजांची पुढील पिढी घडलीच नाही आणि राष्ट्र म्हणून भारताला विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याचा फटका बसला.

ऑलम्पिकमध्ये कमी मेडल्स मिळाले कि आपण सगळेच म्हणतो, “भारताची लोकसंख्या १०० करोड पेक्षाही जास्त पण ऑलम्पिक खेळांमध्ये केवळ बोटांवर मोजण्याइतके मेडल्स मिळवतो.” मग भारताचा एक नागरिक म्हणून आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे कि नाही ? देशाचे जे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत किंवा करू शकतात त्यांच्या खेळांना उपस्थिती लावून त्यांचे मनोबल वाढवणे, हि सुद्धा आपलीच जबाबदारी.

कर्तव्य, ऑलम्पिक, भारतीय खेळाडू, सचिन तेंडूलकर, विराट कोहली, सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, क्रिकेट, khelo india, खेलो इंडिया, khelo india 2018, indian olympic winners, in marathi
Image Source – The Indian Express

हे सर्व सांगण्याचा उद्देश असा कि येत्या ९ जानेवारी पासून विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून सुरु होतोय भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनविण्याचा प्रवास. देशभरातील सुमारे १०,००० तरुण विद्यार्थी भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालया तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयम मध्ये येत आहेत.

देशभरातून पदक जिंकण्याचं ध्येय घेऊन येणाऱ्या ह्या स्पर्धकांच्या उत्साहात भर घालण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गरज आहे ती सुजाण प्रेक्षकांची.

तर मग चला बालेवाडी स्टेडीयमला भरणाऱ्या खेळांचा महामेळावा पाहायला जाऊया…प्रेक्षक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडुयात !


No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.