fbpx
Take a fresh look at your lifestyle.

BSF च्या महिला अधिकाऱ्याबरोबर अक्षय कुमारची किक बॉक्सिंग

0 1,760

अभिनेता अक्षय कुमारचा नवीन ‘केसरी’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली कि अभिनेते चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामाला लागतात. कुणी फेमस टीव्ही शो वर जाऊन सिनेमा प्रमोट करतं तर कुणी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन. यातच अक्षय कुमार सिनेमाच्या प्रमोशनसाठी बीएसएफच्या जवानांबरोबर वेळ घालवताना दिसला.

अक्षय कुमार किती शिस्त प्रेमी आहे हे आपल्याला माहीतच आहे, त्याचं जवानांवर आणि देशावर असणारं प्रेम सुद्धा आपण जाणून आहोत. अश्यातच केसरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी बीएसएफ जवानांबरोबरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल जात आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बीएसएच्या एका महिला अधिकाऱ्याबरोबर किक बॉक्सिंग खेळताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील अक्षय बरोबर होती, त्यांनी बीएसएफ जवानांबरोबर गप्पा तर मारल्याच पण केसरीच्या गाण्यावर डान्स सुद्धा केला.

अक्षयचा आगामी चित्रपट ‘केसरी’ हा सारागढच्या लढाईवर बनवला गेला असून या घटनेवेळी केवळ २१ शूर जवानांनी हजारो अफगाणी सैनिकांचा मुकाबला केला होता. केसरी मधला अक्षयचा पंजाबी लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.