fbpx

व्हिडीओ : जेव्हा नीता अंबानी मराठी मधून भाषण करतात

हिंदी सिनेमात काम करणाऱ्या एखाद्या कलाकाराने मराठी बोलले कि लगेच आपल्या मराठी लोकांना फार आनंद होतो. समोरचा माणूस त्याची मराठी भाषा नसताना देखील मराठी बोलला कि तिथे त्याला आपलेपणा जाणवतो. हिंदी सिनेमात काम करणारे अनेक कलाकार आवडीने मराठी बोलतात. फक्त बॉलिवूड नव्हे तर बिझनेस वर्ल्ड मधील लोक सुद्धा यात मागे नाहीत, याचा प्रत्यय नीता अंबानींच्या भाषणातून आला.

तुमच्यापैकी कुणाला सचिन तेंडुलकर बनायचं आहे , कुणाला लता मंगेशकर बनायचं आहे आणि कुणाला महान उद्योगपती धीरूभाई अंबानी बनायचं आहे असे प्रश्न खणखणीत मराठीत उपस्थित असलेल्या बालकांना विचारताच सर्वानी एका आवाजात होय आम्हाला सचिन, धीरूभाई अंबानी व लता मंगेशकर ह्यांच्यासारखं बनायचं आहे असे एका सुरात सर्व लहान मुलांनी म्हटले. पण उपस्थित मुलांना अस्खलित मराठीमध्ये हा प्रश्न विचारणारी व्यक्ती म्हणजे नीता अंबानी ह्या होत्या, असं म्हटले तर तुम्हाला सुखद धक्का बसेल.

nita ambani, nita ambani speech, nita ambani marathi speech, mukesh ambani

नीता अंबानी ह्यांनी मराठी भाषेतून केलेले भाषण तुम्ही क्वचितच ऐकले असेल पण ह्या प्रसंगी नीता अंबानी ह्यांनी सफाईदार मराठीतून भाषण करून आपणही सच्चे मुंबईकर असल्याचे दाखवून दिले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल इथे धीरूभाई अंबानी स्क्वेअरच्या उदघाटनाप्रसंगी नीता अंबानी ह्यांनी हे भाषण केले. विशेष म्हणजे त्यांनी हे भाषण मराठीतून अतिशय चांगल्या प्रकारे केले व ह्याच भाषणाचा व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला आहे. ह्याप्रसंगी स्वतः मुकेश अंबानीसुद्धा उपस्थित होते.

nita ambani, nita ambani speech, nita ambani marathi speech, mukesh ambani

नीता अंबानी ह्यांच्या भाषणाला तिथे उपस्थित असणाऱ्या दोन हजार वंचित मुलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. माणसे आपल्या श्रमाने बदलतात असे नीता अंबानी ह्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले. ह्यावेळी नीता अंबानी ह्यांनी त्यांचे सासरे धीरूभाई अंबानी ह्यांचे उदाहरण दिले कि, “माझे सासरे धीरूभाई अंबानी हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते. त्यांचे वडील एक शिक्षक होते”. मुंबई हि एक मायानगरी आहे, इथे कुणीहि छोटे अथवा मोठे नाही, पण आपल्या श्रमाने माणसं नशीब बदलतात असे नीता अंबानी ह्यावेळी म्हणाल्या.

nita ambani, nita ambani speech, nita ambani marathi speech, mukesh ambani
जेव्हा नीता अंबानी मराठी मधून भाषण करतात

जेव्हा नीता अंबानी मराठी मधून भाषण करतात

लई भारी ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 7, 2019
No Fields Found.

Leave A Reply

Your email address will not be published.